महसूल सेवक संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी नवनाथ दादाराव इंगोले यांची बिनविरोध निवड !
तालुका प्रतिनिधी ; दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी महसूल सेवक संघटनेची मीटिंग, भागवत चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला शहरातील शासकीय धान्य गोदामात दुपारी १२:०० वाजता पार पडली. या मीटिंगमध्ये महसूल सेवक संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी नवनाथ दादाराव इंगोले, उपाध्यक्षपदी रूपाली ढोले, खजिनदारपदी जावेद मुलाणी व सुनील गोडसे, सचिवपदी समाधान तुकाराम सूर्यगंध, उपसचिवपदी उत्तम राजाराम जावीर, कार्याध्यक्षपदी भागवत चंदनशिवे व विजय माळी, सल्लागारपदी भगवान पारसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सांगोला तालुक्यातील समाधान सूर्यगंध ,भगवान परसे, भागवत चंदनशिवे, नवनाथ इंगोले, दादा कुटे, विजय चव्हाण, सुनील गोडसे, नागनाथ मोहिते, गोपाळ भजनावळे, संभाजी गुजले ,प्रकाश चव्हाण ,तानाजी चव्हाण,आनुज भोसले,विलास मोहिते, उत्तम जावीर, कविता चव्हाण, रूपाली ढोले अदी महसूल सेवक उपस्थित होते.

Post a Comment