नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या समोर, तालुक्यातील विस्कटलेली घडी बसवण्याचे मोठे आव्हान !
तालुका विशेष प्रतिनिधी ; सांगोला तालुक्यात सन २०१९ ते २०२४ या कालावधी सांगोला तालुक्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ५ हजार कोटी रुपयांचा निधी आणून विकास केलेचा दावा केला आहे. परंतु हे जरी खरे असले तरी माजी आमदार शहाजीबापू पाटील हे, या ना त्या कारणांमुळे वारंवार चर्चेत आल्यामुळे,त्यांनी हजारों कोटींचा निधी आणून केलेल्या विकास कामांना तालुक्यातील जनतेने फारसे महत्त्व दिले नाही.सन २०१९ ते २०२१ या दोन वर्षाच्या कालावधी माजी आमदार शहाजीबापू पाटील हे सांगोला तालुक्यातील विविध प्रकारच्या लोकांकडून टक्केवारी घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून ५० खोके घेवून ते गुवाहाटी ला गेल्याचा आरोप करण्यात आला.
त्यानंतर गुवाहाटी मधिल "काय हाटील,काय डोंगार,काय झाडी,सगळं ओके आहे" या वायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग मुळे ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर स्थापन झालेल्या सरकार मध्ये शहाजीबापू पाटील यांची क्रेझ वाढली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापूंना भरभरून निधी दिला.परंतु शहाजीबापू यांनी आणलेल्या निधीची चर्चा कमी, आणि टक्केवारीचीच चर्चा जास्त होवू लागल्यान, शहाजीबापू प्रेमी नागरिक दुखावले गेले. सन २०१९ ते २०२४ या पाच वर्षाच्या कालावधी शहाजीबापू यांनी सर्व सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी वेळ दिला नाही.त्यामुळे शहाजीबापूची सन २०२४ च्या निवडणुकीत पिछेहाट झाली.शहाजीबापू यांचा तालुक्यातील कोणत्याही कार्यालयाच्या अधिका-यावर कसलाही दबाव नव्हता.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळत पुर्ण होत नव्हती शिवाय अधिकारी किंवा कर्मचारी चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणत्याही कामे करत नव्हती.अवैध वाळू उपसा ,अवैध मुरूम,विनापरवाना खडी क्रशर, वीटभट्टी, हॉटेल धाबे वरील अवैध दारूविक्री, जुगार, मटका, गुटखा, चंदन,लाकूड वहातुक, लॉजवर चालणारा वेश्याव्यवसाय, वेगळ्या प्रकारची विकास कामामधून मिळणारी टक्केवारी,वसुली करण्याच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्यामुळे सर्वसामान्य माणसाची कामे झालेली नाहीत.प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे.क्रमशः

Post a Comment