अंधळगाव येथील राजे उमाजी नाईक समाज मंदिरामध्ये बेकायदेशीर रित्या ठेवलेले साहित्य, काढण्याच्या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे ठिय्या आंदोलन !
सोलापूर प्रतिनिधी ; मौजे अंधळगाव ता.मंगळवेढा येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने असणाऱ्या समाज मंदिरामध्ये, बेकायदेशीर रित्या बचत गटाचे साहित्य (सामग्री) ठेवले बाबत.
सदरचे बेकायदेशीर ठेवलेले साहित्य काढून समाज मंदिर खुले करण्यात यावे या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे आज दि.१०/३/२०२५ रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे सचिव उमेश मंडले, मधुकर चव्हाण सर (शिक्षण समिती अध्यक्ष ),सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अनिल मंडले,बापूसाहेब गुजले, अनिल चव्हाण, मल्हारी चव्हाण, संतोष गुजले, नितीन चव्हाण, समाधान गुजले, राज गुजले, मीनाक्षी गुजले, राधिका चव्हाण, नंदा चव्हाण ,मंगल गुजले, सागर इंगोले, सर्जेराव टोकले, उमेश टोकले, रत्नाकर जाधव, शहाजी जाधव इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment