Header Ads

{getWidget} $results={3} $label={recent} $type={list2}

डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या दिलजमाईने आबा,बापू चे टेन्शन वाढले !



सांगोला विधानसभेची जागा ही पारंपारिक महाविकास आघाडीतुन  शेतकरी कामगार पक्षाकडे असताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाने दिपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केल्याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी  शेकापच्या काही उमेदवाराची घोषणा केली आहे.शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज सांगोल्यात मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे दोन नातू डॉ.अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या गटात सुरू असलेला वाद मिटणार असून दोघांचे मनोमिलन होणार आहे. आज शेकापच्या मेळाव्यात सांगोला विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली जाणार आहे.त्यामुळे आबा आणि बापू यांचे टेन्शन वाढणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत